
Cheteshwar Pujara century miss by 1 run : भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सातव्या सामन्यात दमदार खेळी केली. आसाम विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्र संघाच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली आहे. सलामीवर हार्विक देसाईने शतकी खेळी केली. तर चिराग जानीचे शतक अवघ्या २० धावांनी हुकले. त्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने देखील शतकापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला शतकापासून एका धावेने वंचित रहावे लागले. एकीकडे सध्याचे भारतीय फलंदाज रणजी ट्रॉफी स्पर्धेत फ्लॉप ठरत असताना मागची काही वर्षे संघाबाहेर असलेला पुजारा चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे.