

Dasun Shanaka Two Big Knocks In One day :आधुनिक क्रिकेटपटूचे जीवन किती धक-धकीचे होऊ शकते याची झलक काल पाहायला मिळाली आणि त्यावर मात करून कशी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो हे काल ( २ फेब्रुवारी) श्रीलंकन क्रिकेटपटू दासून शनाकाने दाखवून दिले. कारण सकाळी श्रीलंकेत शतक ठोकणारा दासून शनाका संध्याकाळी दुबईत खेळायला गेला आणि तिथेही त्याने वादळी खेळी केली.