
Virat Kohli in Ranji Trophy 2025 Delhi vs Railways Match: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली तब्बल १३ वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील रेल्वेजविरूद्धच्या सामन्यात विराट दिल्ली संघाचा भाग असेल. तर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या सामन्याला मुकणार आहे. स्पर्धेतील फेरीतील सातव्या फेरीच्या सामन्यासाठी विराटला दिल्ली क्रिकेट बोर्डाने संघाचे नेतृत्व करण्यासाठी विनंती केल्याचे समज आहे.