
Deepti Sharma Appointed as DSP of Uttar Pradesh :काही दिवसांपूर्वी भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने तेलंगणाचा पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) झाला. त्यानंतर आता भारताची महिला क्रिकेटपटू अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने उत्तर प्रदेशची पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून पदभार स्वीकारला. दीप्तीचे लहाणपणीचे स्वप्न पूर्ण झाले. दिप्तीने भारतासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. २०२३ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला रौप्यपद मिळवून देण्यात देखील तिचे महत्त्वाचे योगदान होते. तिच्या या यशाबद्दल तिला उत्तर प्रदेश सरकारने ३ कोटी रूपये बक्षीस व पोलिस खात्यातील डीएसपी या पदाने सन्मानित केले.