
भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा खरा नायक ठरला. सिराजने या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारताने हा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. सिराजच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) विशेष बक्षीस मिळणार आहे.