WPL 2024 Ellyse Perry Video : RCB च्या सामन्यादरम्यान असं काय झालं, पेरीनं दमदार फटका मारूनही डोक्याला हात लावला?

Ellyse Perry
Ellyse PerryEsakal

Ellyse Perry Broke Car window In WPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाज एलिस पेरीने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर यूपी वॉरियर्स विरुद्ध सामन्यादरम्यान गाडीची काच फोडली. दिप्ती शर्माच्या षटकात पेरीने एक डीप मिडविकेटला एक जोरदार फटका मारला.

तो फटका इतका शक्तीशाली होती की डिस्प्लेसाठी ठेवण्यात आलेल्या कारच्या काचेचा चुराडा झाला. मात्र एलिस पेरीने काच फुटलेली पाहून आपल्या डोक्याला हात लावा.

Ellyse Perry
IPL 2024 SRH : मुंबई इंडियन्सच्या 'या' माजी गोलंदाजाची SRH मध्ये वर्णी; घेणार डेल स्टेनची जागा

चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने 198 धावा उभारल्या. त्यात एलिस पेरीच्या 37 चेंडूत 58 धावांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर कर्णधार स्मृती मानधनाने 50 चेंडूत केलेल्या 80 धावांचे देखील मोठे योगदान आहे.

आरसीबीच्या या 198 धावांचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने देखील चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर एलिसा हेली आणि किरण नवगिरे यांनी अवघ्या 4 षटकात 47 धावांची दमदार सलामी दिली.

Ellyse Perry
Ranji Trophy 2024 : हार्दिकसारखी बॅटिंग अश्विनसारखी बॉलिंग तरी हा मुंबईकर आयपीएल लिलावात का राहिला अनसोल्ड?

मात्र यानंतर यूपीचा डाव घसरला. त्यांची अवस्था 4 बाद 89 धावा अशी झाली. सोफी डिवाईनने किरण नवगिरे (18) आणि ग्रेस हॅरिस (5) यांची शिकार केली. तर वॉरहेमने चामिरा अटापटूला अन् शोभना शेरावतने श्वेता शेरावतला बाद करत यूपीची अवस्था बिकट केली.

(Cricket Latest News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com