
Rohit Fans vs Virat Fans : अॅडिलेड कसोटीतील पराभवानंतर व गाबा कसोटीतील भारताच्या खराब कामगिरीनंतर विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मावर मिम्स बनवले जात आहेत. विराटने पर्थ कसोटीत शतकी कामगिरी केली पण त्यानंतर दोन कसोटीतील ३ डावांत तो अपयशी ठरला. तर, रोहितच्या बॅटमधून मोठी खेळी आलेली नाही. त्यामुळे अनिल कुंबळेचा फोटो वापरून व त्याच्या नावाने कोट्स लिहून दोघांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ही गोष्ट लक्षात येताच अनील कुंबळेने हे खोटे असल्याचा खुलासा केला व चाहत्यांना सतर्कतेचा आवाहन केले आहे.