
Shubman Gill Fan Girl : शाहरूख खानच्या चित्रपटात एक डायलॉग आहे, "अगर किसी चीज को दील से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेके कोशिश में लग जाती हैं|" आजचा किस्साही तसाच आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आज नेट्स प्रॅक्टिस सेशन केला. सरावानंतर रोहितने फॅन्सना भेटला, त्यांना ऑटोग्राफ दिली. फॅन्सची जिद्द व प्रेम आपल्याला यापुर्वी अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. यावेळीही असेच घडले, रोहित चाहत्यांना भेटत असताना एका तरूण चाहतीने रोहितकडे शुभमन गिलला भेटण्याचा हट्ट केला.