
नाशिक, ता. ७ ः महाराष्ट्र क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू अन्वर शेख यांचे पुणे येथे निधन झाले. नाशिक येथे क्रिकेट खेळायला सुरुवात करतांना, त्यांनी पुढे आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान मिळविले होते. जलदगती गोलंदाजाच्या भूमिकेतून त्यांनी संघासाठी अनेक सामन्यांमध्ये भरीव योगदान दिले होते.