
Gautam Gambhir's Position is not Secure : भारताने न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावली व ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत ३-१ ने पराभव स्वीकारला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा सोबतच भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर देखील टीका झाली. गंभीरचे प्रशिक्षक पद धोक्यात असल्याच्याही बातम्या समोर आल्या. त्यानंतर आता आणखी एक नवी बातमी समोर आली आहे. गौतम गंभीरचे भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचे समजत आहे.