
लंडन : तुम्ही पर्यटनासाठी नव्हे, तर राष्ट्रीय संघातील जबाबदारी पार पाडण्यासाठी येथे आला आहात, असे सांगत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन केले. दौऱ्याचा कालावधी मोठा असला, तरी परदेशात खेळाडूंना कुटुंबीयांसोबत ठेवण्यास बीसीसीआयने मर्यादा घातल्या आहेत.