
नवी दिल्ली : सर्वोत्तम फलंदाज होण्याची झलक शुभमन गिलने दाखवली आहे, तसेच निडर तरुण कर्णधार बनण्याचीही क्षमता त्याने सिद्ध केली आहे; मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ १-२ अशा पिछाडीवर असल्यामुळे गिलची खरी कसोटी आता सुरू होणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.