
Harbhajan Singh vs Shoaib Akhtar Video Viral : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा अवघ्या २ आठवड्यांवर आली आहे. आयसीसी स्पर्धेत भारत पाकिस्तान हा सामना नेहमीच कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना मानला जातो. अशात भारत-पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू खूप वर्षांनी आमने सामने आले. भारतीय माजी फिरकीपटू हरभजन सिंग व पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर मैदानावरचे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा मैदानावर भिडले.