
Cricketers Dance Video Viral: भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आणि संपूर्ण भारतात जल्लोष साजरा झाला. काल सर्व भारतीय खेळाडू मैदानावर डान्स करत आनंदोत्सव साजरा करत होते. त्यात कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहलीने खेळलेला दांडिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आता हार्दिक पांड्याने माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू आणि रिषभ पंतने शुभमन गिलच्या वडिलांसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.