
Broda vs Tripura in Syed Mushtaq Ali T20 Trophy 2024-25 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पांड्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात हार्दिक पांड्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतषबाजी पाहायल मिळाली. त्रिपुराविरूद्धच्या सामन्यातही हार्दिकने पुर्वेझ सुलतानच्या षटकात ४ षटकार आणि एका चौकारासह एकूण २८ धावा कुटल्या व बडोद्याला सामना १२ व्या षटकात जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. बडोद्याने त्रिपुराविरूद्धचा सामना ७ विकेट्सने जिंकला.