
Hardik Pandya : बेंगळूरू येथील चिन्नस्वामी मैदानावर मुंबई व बडोदा दरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना झाला. बरोड्याने प्रथम फलंदाजी करत मुंबईला विजयासाठी १५९ धावांचे आव्हान दिले. पण अजिंक्य राहाणेच्या तुफानी खेळीच्या मदतीने मुंबईने सामना जिंकला. हार्दिक पांड्याने या सामन्यात अवघ्या ५ धावा केल्या . पण मैदानावरील त्याच्या कृतीने सर्वांचीच मने जिंकली.