
Former Pkaistan Cricketer Danish Kaneria accuses PBC: चॅम्पियन्स ट्रॉफीतील अपयश आणि आर्थिक घसरण यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. संघातील भेदभावामुळे माझे करिअर संपले असा आरोप माजी क्रिकेटपटूने पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवर भाषण देण्यासाठी आयोजित एका मेळाव्यात बोलताना केला.