
सिंगापूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) विशेष सर्वसाधारण सभा उद्या गुरुवार (ता. १७)पासून सुरू होत आहे. या बैठकीत प्रामुख्याने द्विस्तरीय कसोटी क्रिकेट फॉर्म्युला आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील सहभागी संघांचा संभाव्य विस्तार या दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.