
दुबई : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी आयसीसीने शुक्रवारी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार कन्कशन (डोक्याला चेंडू लागल्यामुळे जखमी) झालेल्या खेळाडूला किमान सात दिवस विश्रांतीचा कालावधी अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच वाइड चेंडू आणि सीमारेषेवरील झेलांच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.