
Mark Waugh React On Rohit sharma Performance: भारतीय कर्णधार रोहित शर्मा खराब कसोटी फॉर्मसोबत झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत रोहितची कामगिरी फारच खराब राहिली आहे. त्याने मालिकेतील ४ डावात अवघ्या २२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये मेलबर्न कसोटीतील पहिल्या डावात रोहित अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर सिलेक्टर अजित आगरकर यांनी रोहितसोबत चर्चा केली असून रोहितची ही अंतिम कसोटी मालिका असेल, अशी बातमी समोर आली. त्यात आता दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्क वॉ यांनी रोहितच्या कसोटी भविष्यावर प्रश्न उपस्थित करत भारतीय निवड समितीला एक सल्ला दिला आहे.