
Yuvraj Singh vs Tino Best in IML Final: काल, १६ मार्च रोजी भारत व वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान फायनलचा महासंग्राम रंगला, ज्यामध्ये भारताने एकहाती विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने विंडीजला ६ विकेट्सने पराभूत केले. भारताचे सलामीवीर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. पण सामन्याच्या अंतिम टप्प्यात युवराज सिंगला फलंदाजीसाठी यावे लागले अन् नेहमी आक्रमक फलंदाजी करणारा युवी काल मैदानावर आक्रमक अंदाजात दिसला.