Ranji Trophy : विदर्भ मध्य प्रदेशवर भारी ; रणजी करंडक,२६१ धावांची आघाडी

अमन मोखाडे, यश राठोड या युवा शिलेदाराच्या जोडीला ध्रुव शोरे, करुण नायर व अक्षय वाडकर या अनुभवी दिग्गजांची साथ लाभल्याने रणजी करंडक उपांत्य सामन्यात यजमान विदर्भाने मध्य प्रदेशविरुद्ध आव्हान उभे केले आहे.
Ranji Trophy
Ranji Trophy sakal

नागपूर : अमन मोखाडे, यश राठोड या युवा शिलेदाराच्या जोडीला ध्रुव शोरे, करुण नायर व अक्षय वाडकर या अनुभवी दिग्गजांची साथ लाभल्याने रणजी करंडक उपांत्य सामन्यात यजमान विदर्भाने मध्य प्रदेशविरुद्ध आव्हान उभे केले आहे. पहिल्या डावात ८२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या विदर्भाने तिसऱ्या दिवसाअखेर सहा बाद ३४३ धावा करीत २६१ धावांची आघाडी घेतली आहे.

या लढतीत आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे नाबाद असलेली यश राठोड आणि आदित्य सरवटे ही जोडी व उर्वरित फलंदाज किती धावांची भर घालतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. साडे तीनशे ते पावणे चारशे धावांची आघाडी मध्य प्रदेशच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवण्यास पुरेशी ठरू शकते. पहिल्या डावात विदर्भाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळणाऱ्या मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात यजमानांच्या फलंदाजांना अडचणीत आणताना बराच घाम गाळावा लागला.

Ranji Trophy
Ranji Trophy : मुंबई ४८व्यांदा रणजी अंतिम फेरीत ; तमिळनाडूवर तीन दिवसांच्या आत डावाने विजय

अथर्व तायडे बाद झाल्यामुळे नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेला अक्षय वखरे सकाळी फार काळ टिकू शकला नाही. अनुभवाच्या गोलंदाजीवर त्याने स्लीपमध्ये झेल दिला. त्यानंतर आलेला अमन मोखाडे सुरुवातीला चाचपडत खेळत होता. मात्र, स्थिरावल्यावर त्याने काही अप्रतिम फटके मारले. संयम दाखविताना त्याने आपण विदर्भासाठी भविष्यातील आशास्थान आहोत, हे दाखवून दिले.

संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव १७०, मध्य प्रदेश पहिला डाव २५२, विदर्भ दुसरा डाव सहा बाद ३४३ (ध्रुव शोरे ४०, सहा चौकार, अमन मोखाडे ५९, सात चौकार, करुण नायर ३८, यश राठोड खेळत आहे ९७, अक्षय वाडकर ७७, आठ चौकार, आदित्य सरवटे खेळत आहे १४, तीन चौकार, आवेश खान १-६५, अनुभव अग्रवाल २-६८, कुलवंत खेजरोलिया १-४५, कुमार कार्तिकेय २-७३०.

यश-वाडकरची दीड शतकी भागीदारी

यश राठोड हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, संघ अडचणीत असताना त्याने आज काही अप्रतिम फटके मारताना उत्तम संयमही दाखविला. २३ वर्षांचा असलेला यश प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या पहिल्या शतकापासून तीन धावा दूर आहे. आजच्या खेळात त्याने १६५ चेंडूचा सामना केला व १२ चौकार मारले. त्याने कर्णधार अक्षय वाडकरसोबत सहाव्या गड्यासाठी १५८ धावांची भागीदारी केल्यानेच विदर्भाला आपली स्थिती भक्कम करता आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com