
Josh Hazlewood praised Mohammed Siraj : अॅडिलेड कसोटीतील मोहम्मद सिराज व ट्रॅव्हिस हेडमधील भांडण चांगलचं चर्चेत राहिलं. त्यासाठी त्यांना ICC ने दंड देखील ठोठावला आहे. भांडणांमुळे सिराज व हेडला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले. कोणी सिराजची बाजू घेतली तर कोणी हेडची. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना सिराजला प्रेक्षकांकडून चिडवण्यात आले. काहींनी तर, सिराजला भांडण करायची काहीच गरज नव्हती म्हणत, हेडची बाजू घेतली. पण हेडचा संघातील साथीदार व दुखापतीमुळे सध्या मैदानाबाहेर असलेल्या जोश हेझलवूडने सिराजी स्तुती केली आहे.