
IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने १८१.६ kmph वेगाने चेंडू टाकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण सिराजने खरच या वेगाने चेंडू टाकलाय का? क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने टाकला आहे. २००३ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याने १६१.३ किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला होता. जर सिराजने आज टाकलेला चेंडू १८१.६ किमी प्रती तास वेगाचा असेल, तर तो मोठा विक्रम होईल.
सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सिराजने टाकलेल्या २५ व्या षटकातील ५ व्या चेंडूचा वेग १८१.६ किमी प्रती तास इतका दाखवत आहे. पण टीव्हीवर दाखवल्याप्रमाणे सिराजनने टाकलेल्या चेंडूची गती इतकी वेगवान होती का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.