
IND vs AUS Champions Trophy Semifinal Toss and Playing XI: भारतीय संघ आज चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफानलच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलग १४ वा नाणेफेक गमावला आहे. सामन्याचा नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकून दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून ऑस्ट्रेलिया संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत.