IND vs AUS : भारत बाद फेरीचा अडथळा ओलांडणार? ऑस्ट्रेलियाशी उपांत्य फेरीची झुंज

IND vs AUS semifinal Champions Trophy 2025 live updates : १४ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेत कांगारुंवर विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने २०११ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करीत पुढे जाऊन विश्‍वकरंडक पटकावला होता.
IND vs AUS semifinal Champions Trophy 2025
IND vs AUS semifinal Champions Trophy 2025esakal
Updated on

सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा

दुबई, ता. ३ : भारत-ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य देशांमध्ये उद्या (ता. ४) चॅम्पियन्स करंडकाचा उपांत्य सामना रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने २०११ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करीत पुढे जाऊन विश्‍वकरंडक पटकावला होता. त्यानंतर मात्र २०१५ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत आणि २०२३ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाने भारताला पराभूत करीत विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला होता. भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धांमधील बाद फेरीचा अडथळा याप्रसंगी ओलांडणार का, या प्रश्‍नाचे उत्तर मंगळवारी मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com