
IND vs BAN Womens U19 Asia Cup 2024: भारतीय १९ वर्षांखालील महिला संघाने आशिया कप २०२४ स्पर्धेत बांगलादेशविरूद्धचा दणदणीत विजय मिळवला. भारताने हा सामना अवघ्या १२.१ षटकातच जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला व बांगलादेश संघाचा डाव ८ बाद ८० धावांवर रोखला. प्रत्युत्तरात भारताची सलामीवीर जी त्रिशाने ५८ धावांची नाबाद खेळी केली. त्रिशाला कर्णधार निक्की प्रसादची २२ धावांची साथ मिळाली आणि भारताने सामन्यात ८ विकेट्सने बाजी मारली.