
IND vs ENG 2nd ODI Playing XI: एकीकडे कर्णधार रोहित शर्माचे प्रदीर्घ काळ लांबत असलेले अपयश, त्यातच आता विराट कोहली तंदुरुस्त झाल्यामुळे कोणाला वगळायचे अशा द्विधा मनस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन आहे. दुसरीकडे यशाची लय कायम ठेवून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिका विजयही मिळवण्यासाठी भारतीय संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे विराटच्या जागेसाठी निवडस समिती कोणाला वगळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरले आहे.
इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेतील दुसरा सामना आज कटक येथे होणार आहे. काही दिवसांवर आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची असल्याने पूर्ण संघाची लय त्याचबरोबर अंतिम ११ खेळाडूही निश्चित करायची संधी आहे.