India Vs England 3rd Test Day 4 Live Score : भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली. भारताने 557 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावात गुंडाळला. रविंद्र जडेजाने 5 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. रविंद्र जडेजाने शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावात संपवला. बेन डकेटने 153 धावांची धडाकेबाज खेली केली होती. त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या 214 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 430 धावा केल्या. इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 122 धावात गारद झाला.
अश्विननेही दुसऱ्या डावात विकेट्सचे खाते उघडले. त्याने 16 धावा करणाऱ्या हार्टलीला बाद करत इंग्लंडला नववा धक्का दिला.
जडेजानंतर कुलदीप यादवने बेन स्टोक्सला बाद करत इंग्लंडला सहावा आणि मोठा धक्का दिला.
रविंद्र जडेजाने जो रूटला 7 धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. भारतीय संघ आजच सामना संपवण्यासाठी खेळताना दिसतोय.
चहापानानंतर खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंडला रविंद्र जडेजाने पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने ओली पोपला 3 तर जॉनी बेअरस्टोला 4 धावांवर बाद केलं.
भारताचे 557 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या इंग्लंडला पहिल्या 10 षटकातच दुसरा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने झॅक क्राऊलीला 11 धावांवर बाद केलं. इंग्लंडचा चहापानापर्यंत अवस्था 2 बाद 18 धावा अशी झाली आहे.
मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या बेन डकेटला 4 धावांवर धावबाद केलं. डकेटने पहिल्या डावात 153 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
भारतीय संघाने आपला दुसरा डाव 4 बाद 430 धावांवर घोषित केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद 214 धावा तर सर्फराज खानने 68 धावांची नाबाद खेळी केली.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकलं. त्याला साथ देणाऱ्या सर्फराज खानने देखील पदार्पणाच्या कसोटीतच दोन्ही डावात अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला.
Yashasvi Jaiswal becomes the first Indian to score 2 Double Hundreds against England in Tests.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्याने दमदार फलंदाजी करत 10 षटकार अन् 14 चौकारांसह 210 चेंडूत 186 धावा ठोकल्या.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहेत. यशस्वीच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. भारताने 325 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सध्या भारताची आघाडी 450 धावांपेक्षा जास्त आहे.
चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने चार गडी गमावून 314 धावा केल्या आहे. सध्या यशस्वी जैस्वाल 149 धावांवर तर सर्फराज 22 धावांवर खेळत आहे. दोघांनीही तुफानी फलंदाजी करत 62 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाची आतापर्यंत एकूण 440 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताकडे 126 धावांची आघाडी होती.
258 धावांवर भारताला चौथा धक्का बसला आहे. कुलदीप यादव 27 धावा करून बाद झाला. त्याला रेहान अहमदने आऊट केले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान क्रीजवर आहेत. भारताची आघाडी 410 धावांवर पोहोचली आहे. शुभमन गिल ९१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
टीम इंडियाला 246 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. शुभमन गिल 91 धावा करून धावबाद झाला. सध्या यशस्वी जैस्वाल कुलदीप खेळत आहे. यशस्वी शनिवारी रिटायर्ड हर्ट झाला होता.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारत दोन गड्यांच्या मोबदल्यात 196 धावांनी पुढे खेळत आहे. नाईट वॉचमन कुलदीप यादव चार धावा करून क्रीजवर आहे तर शुभमन गिल 67 धावा करून क्रीजवर आहे. भारताने 320 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल पुन्हा फलंदाजी करू शकेल की नाही हे पाहू....
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.