
IND vs ENG 4th T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील टी-२० मालिकांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आता घरच्या मैदानावर होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही पहिल्या दोन लढतींत विजय मिळवून धडाकेबाज सुरुवातही केली, मात्र तिसऱ्या टी-२० लढतीत पाहुण्या इंग्लंडने विजयाला गवसणी घालून पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखले.