

IND vs ENG 4th T20I
esakal
IND vs ENG, 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (९ जुलै) ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. मालिकेत इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतली असून भारतासाठी हा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे.
हा सामना जिंकण्यात भारत अपयशी ठरला, तर इंग्लंड मालिकेत अभेद्य आघाडी घेईल. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर पुनरागमनाचे मोठे आव्हान आहे.