IND vs ENG 5th Test: इंग्लंडची 'ताकद' कमी झाली, प्रमुख जलदगती गोलंदाजाने माघार घेतली! भारताला विजयाची संधी
India vs England 5th Test Marathi Cricket News : ओव्हल कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. ख्रिस वोक्स दुखापतीमुळे सामना खेळू शकणार नाही. भारतासाठी ही विजयाची मोठी संधी आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत सामन्यातील पहिल्या दिवशी यजमानांना पहिला धक्का बसला आहे. लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.