
India Playing 11For 1st T20 Against England : आजपासून भारतीय संघाच्या नवीन वर्षातील पहिल्या मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जॉस बटलच्या संघाविरूद्ध ईडन गार्डन स्टेडियमवर झुंज देईल. मोहम्मद शमी एक वर्षानंतर पुन्हा मैदानावर उतराणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात देखील शमीची निवड झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य शमीच्या कामगिरीवर असणार आहे. इंग्लंडने एक दिवसापूर्वीच आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली असून भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असेल आपण जाणून घेऊयात.