
IND vs ENG 3rd T20: तिलक वर्माच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० लढतीत पाहुण्या इंग्लंड संघावर सनसनाटी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आता दोन देशांमध्ये उद्या (ता. २८) राजकोट येथे तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यात यश संपादन करून टी-२० मालिकेतील विजयी मालिका कायम राखण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या बॅटमधून अद्याप धावा निघालेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याकडूनही धावांच्या अपेक्षा असतील. इंग्लंडला मात्र मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे.