IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

IND VS ENG 1ST ODI LIVE STREAMING: भारत-इंग्लंड वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, हेड-टू-हेड रेकॉर्ड, सामन्यांच्या वेळा, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि थेट प्रक्षेपणाची माहिती जाणून घ्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष.
IND vs ENG 1st ODI

IND vs ENG 1st ODI

esakal

Updated on

IND VS ENG 1ST ODI LIVE STREAMING: इंग्लंड दौरा भारतीय संघासाठी आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला ४-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर उर्वरित चार सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही.

आता मात्र टी-20 मधील अपयश मागे टाकत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू पुन्हा मैदानात दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com