
IND vs NZ Champions Trophy Final: भारत आणि न्यूझीलंड हे यंदाच्या चॅम्पियन्स क्रिकेट करंडकातील सर्वोत्तम संघ व माजी विजेते आज (ता. ९) अजिंक्यपदाच्या लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघाचे पारडे कागदावर जड वाटत असले तरी न्यूझीलंड संघाला कमी लेखून चालणार नाही.
भारतीय संघाने खेळलेले सर्व सामने चांगल्या फरकाने जिंकले आहेत. विजयाचा धडाका लावलेल्या न्यूझीलंड संघाचा एकमेव पराभव भारतीय संघाकडूनच झाला आहे. कागदावरच नव्हे, तर मैदानावरही दोन्ही संघांचे बलाबल अगदी सारखे असल्याने अंतिम सामन्यात बाजी मारायची संधी दोन्ही संघांना समसमान असल्याची भावना मनात येते आहे. अर्थातच असे म्हणत असताना नुसतेच भावनिक नाही, तर फिरकीच्या पाठबळामुळे भारतीय संघाचे पारडे किंचित का होईना जड वाटते आहे.