New Zealand won Champions Trophy 2000 by defeating india
New Zealand won Champions Trophy 2000 by defeating indiaesakal

IND vs NZ: सचिन अन् गांगुली लढले पण न्यूझीलंडने भारताच्या खिशातली फायनल जिंकून मिळवली होती चॅम्पियन्स ट्रॉफी

IND vs NZ Champions Trophy: न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताला पराभूत करून पहिली आयसीसी स्पर्धा जिंकली होती. संपूर्ण सामना जाणून घ्या.
Published on

New Zealand won Champions Trophy 2000 by defeating India भारतीय संघ आज न्यूझीलंडविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भिडणार आहे. तुम्हाला माहित आहे का? २००२ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारत व न्यूझीलंड आमने सामने आले होते आणि न्यूझीलंडने भारताला पराभूत करून पहिली आयसीसी स्पर्धा जिंकली होती. या सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीने शतक व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अर्धशतक ठोकले होते. पण न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सने शतकानेच प्रत्युत्तर दिले आणि न्यूझीलंडने ४ विकेट्सने सामन व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com