IND Wvs SA W T20I: भारताचा सलग दुसरा पराभव! मालिका गमावण्याचे संकट; आता ‘करो या मरो’ ची लढाई
South Africa take 2-0 series lead: भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरा पराभव सहन करावा लागला. पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारत ०-२ ने पिछाडीवर असून तिसरा सामना करो या मरो ठरणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा रविवारी सलग दुसरा पराभव झाला. यजमान दक्षिण आफ्रिका महिला संघाने भारतीय संघावर ८ विकेट्स आणि १७ चेंडू राखून विजय मिळवला आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.