IND A vs PAK A: तिलक वर्माचं शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी व्यर्थ! हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा भारतावर ४८ धावांनी विजय

Pakistan Beat India A by 48 Runs in Rising Stars Asia Cup: रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये पाकिस्तानने भारत अ संघाचा ४८ धावांनी पराभव केला. तिलक वर्माचं शतक आणि अभिषेक शर्माच्या ७० धावांची खेळी व्यर्थ ठरली. पाकिस्तानने भारतासमोर ३१४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
Pakistan Beat India A by 48 Runs in Rising Stars Asia Cup

Pakistan Beat India A by 48 Runs in Rising Stars Asia Cup

esakal

Updated on: 

Pakistan Beat India A by 48 Runs in Rising Stars Asia Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचते. दोहा येथे झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कपमधील भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्यातही चांगलीच रंगत पाहायला मिळाली.

मात्र, या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अभिषेक शर्माची ७० धावांची आक्रमक खेळी आणि कर्णधार तिलक वर्माचं शतकही भारताला विजय मिळवून देऊ शकलं नाही. पाकिस्तानने भारताचा ४८ धावांनी पराभव केला.

Loading content, please wait...