
ब्रिस्बेन : टी-२० मालिकेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारत अ महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेची सुरुवात दमदार केली. राधा यादव (३/४५) व यास्तिका भाटिया (५९ धावा) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारत अ महिला संघाने बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन अ महिला संघावर तीन विकेट व ४८ चेंडू राखून मात केली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.