
India Defeated Australia in IML Semifinal : युवराज सिंग सेमीफायनलमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाला नडला. त्याने फटकेबाजीसह ५९ धावा ठोकल्या. तर कर्णधार सचिन तेंडुलकरने दर्जेदार फलंदाजीसह ४२ धावा उभारल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी २२१ धावांचे आव्हान दिले. पण शाहबाझ नदीमच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचा डाव १२६ धावांवर गुंडाळला. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीचा सामना ९४ धावांनी जिंकला आणि फायनलमध्ये धडक दिली आहे. (IND vs AUS)