MS Dhoni Birthday: एमएस धोनीची संपत्ती किती? क्रिकेट व्यतिरिक्त कुठून करतो मोठी कमाई, जाणून घ्या

MS Dhoni: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीची संपत्ती किती आणि त्याची कमाई कशी होते, याबाबत जाणून घ्या.
MS Dhoni | IPL | CSK
MS Dhoni | IPL | CSKSakal

MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज त्यांचा वाढदिवस असून त्यानां ४३ वर्ष पुर्ण झाले आहेत. धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी रांचीमध्ये झाला.

त्याने क्रिकेटविश्वात अशी छाप सोडली की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो सर्वाधिक प्रसिद्धित राहतो. कमाईच्या बाबतीतही धोनीची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. माही ब्रँड एंडोर्समेंटद्वारे करोडोंची कमाई करत आहे.

आयपीएलमधून करोडोंची कमाई

क्रिकेट हे एमएस धोनीच्या लोकप्रियतेमध्ये सर्वात मोठे कारण आहे. दरम्यान क्रिकेटमधून त्याने मोठी कमाई केली आहे. भारतासाठी खेळतानाही त्याला सामनाशुल्क आणि बीसीसीआयच्या करारामधून कोट्यवधी रुपये मिळाले आहे. धोनी आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू म्हणून १२ कोटी रुपये घेतो.

गेल्या १७ आयपीएल हंगामात आयपीएलमधून जवळपास १९० कोटी रुपये कमावले आहेत. ही रक्कम केवळ संघात सामील असण्याची आहे. याव्यतिरिक्तही त्याची सामनाशुल्क आणि पुरस्कार यामधून मोठी कमाई होते.

क्रिकेटव्यतिरिक्च व्यवसाय क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा आहे. तो त्याच्या कंपन्या आणि त्याच्या गुंतवणुकीतूनही चांगली कमाई करतो

MS Dhoni | IPL | CSK
HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे 7 रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

धोनीची संपत्ती

धोनीच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, मीडियातील अनेक रिपोर्ट्लनुसार तो जवळपास १०४० कोटींचा मालक आहे. क्रिकेटमधील उत्पन्नाव्यतिरिक्त, यामध्ये विविध कंपन्यांचे ब्रांस एंडोर्समेंट , विविध कंपन्यांमधील त्याच्या गुंतवणुकीतून परताव्यासह इतर व्यवसायातील उत्पन्नाचा समावेश आहे.

क्रिकेट खेळणे आणि जाहिराती करण्याव्यतिरिक्त,  त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचे अंदाजे मासिक उत्पन्न सुमारे ४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते..

झारखंडमध्ये सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती

धोनीच्या कमाईचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की तो झारखंडमध्ये सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून झारखंडमधील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती आहे. धोनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३८ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला होता.

बॉलीवूड सेलिब्रिटीपेक्षाही अधिक जाहिरात

धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. तो बऱ्याच मोठ्या कलाकारांपेक्षाही अधिक कंपन्यांच्या ब्रँडचा चेहरा आहे. गेल्या वर्षापर्यंत तो जाहिरात करणाऱ्या कंपन्यामध्ये MasterCard, Jio Cinema, Skipper Pipe, Fire-Bolt, Oreo आणि Gulf Oil या नावांचा समावेश आहे.

MS Dhoni | IPL | CSK
MS Dhoni: धाकधूक वाढलं होतं, बड्डे गिफ्ट साठी धन्यवाद.. थालाने टीम रोहितला दिल्या शुभेच्छा, काय म्हणाला धोनी ?

धोनीची गुंतवणूक

धोनीच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे तर त्याने बऱ्याच रिपोर्ट्सनुसार अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. याद्वारे त्याला प्रचंड परतावाही मिळतो. याशिवाय एमएस धोनीचा स्वतःचा फिटनेस आणि लाइफस्टाइल कपड्यांचा ब्रँड सेव्हन देखील त्याच्या कमाईमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. याशिवाय धोनी फुटबॉल संघ चेन्नईयन एफसी, माही रेसिंग टीम इंडिया आणि फील्ड हॉकी संघ रांची रेंजचा सह-मालक आहे.   

याशिवाय महेंद्रसिंग धोनी कडकनाथ चिकनची शेतीही करतो. कडकनाथ कोंबडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती पूर्णपणे काळी (ब्लॅक कडकनाथ) आहे.

आलिशान घर आणि फार्महाऊस

एमएस धोनीने रांचीमध्येच भलेमोठे फार्महाऊस बनवले आहे, रिपोर्ट्सनुसार हे फार्म हाऊस ४३ एकरांमध्ये बांधण्यात आले आहे.  जिथे तो सेंद्रिय शेतीही करतो. याशिवाय धोनीच्या इतर महत्त्वाच्या गुंतवणुकीत हॉटेल माही रेसिडेन्सी आणि ऑरगॅनिक फार्मिंगचाही समावेश आहे. हे हॉटेल त्यांच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे.  

गाड्यांची आवड

माहीकडे महागड्या कार आणि बाईक्सचा मोठा संग्रह यामध्ये प्रामुख्याने Hummer H2, AudiQ7, Land Rover, Ferrari 599GTO, NissanJonga, mercedes Benz GLE, Rolls Royas Silver Shadow सारख्या कार आहेत. धोनीला फक्त कारच नाही तर बाइक्सचीही खूप आवड आहे. यामध्ये Kawasaki Ninja H2, Harley Davison FatBoy, Ducati 1098 आणि Yamaha RD 350 यांचा समावेश आहे.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com