
लंडन : भारतीय संघाने सोमवारी यजमान इंग्लंड संघावर सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशा बरोबरीत राखली. विराट कोहली, रोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन या अनुभवी व महान खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत नेत्रदीपक खेळ साकारला.