India Support Staff: नवा ट्विस्ट! गंभीरने संपूर्ण भारतीय स्टाफचा हट्ट सोडला; परदेशी खेळाडूसाठी BCCIकडे लावला वशीला

Gautam Gambhir's refers Dutch player as Team India's fielding coach: टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड आणि त्यांच्या सहयोगी प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपला आहे. आता गौतम गंभीरला टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आला आहे.
India new head coach Gautam Gambhir wants Ryan ten Doeschate in support staff
India new head coach Gautam Gambhir wants Ryan ten Doeschate in support staffeSakal

टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड आणि त्यांच्या सहयोगी प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपला आहे. आता गौतम गंभीरला टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आला आहे.

गौतम गंभीरला टीम इंडियाचा प्रशिक्षक बनवल्यानंतर आता भारतीय संघाचा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काही बातम्याही समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर टीम इंडियाचा फिल्डिंग कोच म्हणून एका डच खेळाडूच्या नावाची वकिली करत आहे.

India new head coach Gautam Gambhir wants Ryan ten Doeschate in support staff
'पडद्यामागे काय घडलं हे कोणाला माहीत नसतं...' पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केला 'तो' व्हिडिओ

गौतम गंभीरने ज्या खेळाडूचे नाव सुचवले आहे ते नेदरलँड्सचा माजी स्टार खेळाडू रायन टेन डोशेट आहे. रायन हा 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गंभीरचा सहाय्यक प्रशिक्षक होता.

वृत्तानुसार, गौतम गंभीरने बीसीसीआयला 44 वर्षीय माजी डच आंतरराष्ट्रीय खेळाडूला प्रशिक्षक म्हणून जोडण्याची विनंती केली आहे. रायन मेजर क्रिकेट लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स सपोर्ट संघांसोबत देखील काम करतो.

India new head coach Gautam Gambhir wants Ryan ten Doeschate in support staff
ICC Champions Trophy - येत नाही जा! BCCI चा पाकिस्तानात जाण्यास नकार; ICC ला दिले दोन देशांचे पर्याय

बीसीसीआयची भूमिका काय?

सध्या अशी चर्चा सुरू आहे की बीसीसीआय टी दिलीपला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून संघात पुन्हा सामील करू इच्छित आहे. अशा स्थितीत गौतम गंभीरच्या मागणीनुसार टेन डोशेटे यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील केले तर त्याची भूमिका काय असेल. आता बीसीसीआय गौतम गंभीरचा सहकारी म्हणून कोणाची निवड करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com