
हेडिंग्ले, लीड्स : खास करून उन्हाळाच्या दिवसांत इतर खंडांच्या तुलनेत युरोपचा खंड चांगल्या हवामानासाठी जाणला जातो. त्यात लीड्स जे शहर इंग्लंडच्या उत्तरेला असूनही स्वेटरची आठवणही होत नाहीये. भारत वि. इंग्लंड पहिला कसोटी सामना लीड्स शहराच्या प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर होणार असताना पहिले दोन दिवस चांगले ऊन असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.