
पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी कारवायांनंतर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय चुकीचाच आहे. ‘आशिया कप’मध्ये भारतीय संघ सहभागी होत असला तरी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये.
केंद्र सरकारने देशासोबतचे सर्व संबंध तोडले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अजूनही निर्णय घेत नसेल तर बीसीसीआय सरकारपेक्षा मोठे नाही, असे मत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.