
Team India For T20 series Against England: नवीन वर्षातील पहिली द्विदेशीय मालिका भारत इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. २२ जानेवारी पासून ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या ट्वेंटी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विकेटकीपर फलंदाज ध्रुव जरेलला संघात स्थान मिळाले आहे.