
नवी दिल्ली : नेशन्स फुटबॉल करंडक येत्या २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा समावेश आहे. भारतीय संघाचा ब गटात समावेश असून, या गटामध्ये ताजिकिस्तान, इराण व अफगाणिस्तान या देशांशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत. भारताचा सलामीचा सामना ताजिकिस्तानशी होणार आहे. ही लढत २९ ऑगस्टला रंगणार आहे.