
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ गाजवल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आता कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झाले आहेत. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. ही मालिका खास असणार आहे, कारण रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर होणारी ही पहिलीच मालिका असेल. कसोटी संघाचे कर्णधारपद शुभमन गिल ( Shubman Gill) कडे सोपवण्यात आले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवीन सुरुवात करणार आहे. गिलही नेतृत्वाच्या जबाबदारीसाठी उत्सुक आहे, परंतु त्याला ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग याने सल्ला दिला आहे.