IND Vs ZIM : हॉटस्टारवर नाही तर... 'या' चॅनलवर पाहता येणार टीम इंडियाच्या पुढच्या टी-20 मालिकेचा थरार

India Tour Of Zimbabwe 2024 Live Streaming : भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 वर्ल्ड कप 2024चे विजेतेपद पटकावले आहे. भारताची पुढची मालिका आता झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 सीरीजचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार आहे.
India Tour Of Zimbabwe 2024 Live Streaming
India Tour Of Zimbabwe 2024 Live Streamingsakal

India Tour Of Zimbabwe : भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. भारताची पुढची सीरीज आता झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 6 जुलैपासून खेळवली जाणार आहे. त्यासाठीची बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे.

यावेळी भारतीय संघाची धुरा युवा शुभमन गिलच्या हातात असणार आहे. पण अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार आहे.

India Tour Of Zimbabwe 2024 Live Streaming
Dinesh Karthik: 'यावेळी RCB ट्रॉफी जिंकणार...' १ जूनला निवृत्ती घेतलेला स्टार खेळाडू १ जुलैला पुन्हा परतला ताफ्यात

यंदाचा टी-20 वर्ल्ड कपचा थरार हॉटस्टारवर रंगणार होता. पण भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 सामने हॉटस्टारवर नाही तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क प्रसारित होणार आहेत. सोनी स्पोर्ट्स टेन 3 (हिंदी) SD आणि HD, सोनी स्पोर्ट्स टेन 4 तमिळ/तेलुगु आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 SD आणि HD वर या चॅनलवर तुम्हाला सामन्याचा आनंद घेता येईल. यासोबत हा ऑनलाइन पाहण्यासाठी तुम्हाला Sony Live ॲपचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.

India Tour Of Zimbabwe 2024 Live Streaming
Indian Cricket Team: टीम इंडिया बार्बोडोसमध्ये अडकली! इच्छा असतानाही मायदेशी परतता येईना, कारण आलं समोर

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 सीरीजचे वेळापत्रक :

  • पहिला T20I - शनिवार, 6 जुलै

  • दुसरा T20I – रविवार, 7 जुलै

  • तिसरा T20I – बुधवार, 10 जुलै

  • चौथा T20I - शनिवार, 13 जुलै

  • पाचवा T20I – रविवार, 14 जुलै

भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल , ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेट किपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, शिवम दुबे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com